संत-महंत-महापुरुष-समाज सुधारक-संशोधक-जवान-किसान-श्रमिक -शास्त्रज्ञ-उद्योजक-विचारवंत यांच्या कार्याला व विचारांना प्रथम वंदन ! थोरा मोठ्यांना स्मरून नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण जीवन मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहोत..मी ग्रामीण भागातून असल्याने तिथली संस्कृती सामाजिक व धार्मिक प्रबोधनात्मक शैली त्यातून अंगी बाणलेली योग्य तीच विचारधारा तदपासूनची भौगोलिक व सामाजिक परिस्थिती व त्यातून घेतलेला बोध.
1977 ते 2000 काळातील गावच्या लोकांचे आरोग्य उत्पन्नाची साधन पालकांच्या अडचणी तत्कालीन परिस्थितीत पाण्याची तीव्र टंचाई विजेचा तुटवडा रॉकेलच्या चिमणीच्या दिव्याचा आधार त्या काळातील कंदीलाची उपयुक्तता दळणवळणाच्या साधनांची कमतरता त्याकाळच्या रोजगार उपलब्ध साधनांची उपयुक्तता शेळ्या,कोंबड्या,पशुपालन,गाय म्हैस,बैल.
बैलपोळा जत्रेतल्या रेड्यांच्या टकरी रांगड्या मातीतल्या कुस्त्या कबड्डी नुकताच अती लोकप्रिय झालेला क्रिकेटचा खेळ. आमच्या पूर्ण गावात 1 टीव्ही संच आणि ते पाहण्याची उत्सुकता आगतिकता व तासंतास वाट पाहत अखेरीस येणारी लाल परी एसटीची सफर.. ऊस तोडीसाठी पर जिल्ह्यात निघालेल कुटुंबाच जीत्राब,कामगार मजुरांची हालाखी,शेतकऱ्यांच काबाडकष्ट, गावात सुतारनेहावर सुतार कामाची कला कुसर पाहत दिवसभर बसलेले काही लोकं, बारा बलुतेदार,विवधतेचे दर्शन देणारे कारागीर लोक,शिक्षणातली सक्त शिस्त शिक्षकांची भीती आणि गुरुजींचा तेवढाच पूजनीय आदर.
आम्ही अनुभवलेली ग्रामीण जीवन शैलीतील आत्मिकता. तेवढेच अज्ञानाचे आसूड जीवन अगदी सुखदुःखाने काबाडकष्टाने सचोटी आणि धैर्यान ओथंबलेल... शाळेत असताना आवडीचा विषय इतिहास आणि त्यात गुरुजींनी समक्ष उभारलेले छत्रपती शिवाजी महाराज त्या विचारांचा रुजलेलं स्फुलिंग ती प्रेरणा महात्मा गांधींचा अतिव आदर बाबासाहेबांची सुदृढ प्रेरणा महात्मा फुलेंचा सुधारभाव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे केवढ ते अभिमानी अप्रूप.. गेल्या साडेचार दशकांच्या जगण्यात अनेक कडू गोड असे मिश्रित अनुभव आले त्या अनुभवाच्या सोबतीन जीवनचक्र चालूच आहे आणि ते अव्याहत राहीलच.खरं तर अनुभवाचं ग्रामीण विद्यापीठ ही सर्वात मोठी जीवन संस्था आहे आणि मी किंवा आम्ही आपण अनुभवत आलोत आणि ते चालूच आहे.. सुख काय दुःख काय ते आपल्या मानण्यावर आहे हे चक्र तर चालूच राहणार आणि त्याशिवाय खरी मजाही नाही माझ्या जीवनात मला ही गोष्ट जमत नाही आणि कदाचित समजण्यास अवघड असेल असं मी कधीच मानलं नाही. प्रत्येक गोष्टीची आत्मिक जिज्ञासेन उकल करण्याचा ती प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा आणि अनुभव घेऊन त्यातला आनंद घेण्याचा नेहमीच प्रमाणिक प्रयत्न करत आलोय.
ई 3 री वर्गात असताना प्रथम छोटे किराणा दुकान सुरू केले.पुढे टप्या टप्याने मार्ग बदलत नवनवीन करण्याच्या प्रयत्नात किनेरकी,पेंटिंग, पानस्टॉल,फोटोग्राफी,भाजीपाला शेती,कृषी सेवा केंद्र, पत्रकारीता,राजकीय पक्षात तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष,प्रदेश उपाध्यक्ष, शैक्षणीक चित्रपट निर्माता,लोकसंसद मोबाईल रेडिओ - साप्ताहिक लोकसंसद पेपर. लोकसंसद सुविधा केंद्र.सौ.माजी सरपंच ग्राम पंचायत,शैक्षणिक कार्यात क्रांती ग्राम एनजीओ माध्यमातून 250 ऊसतोड कामगारांच्या मुला_मुलींची निवासी आश्रमशाळा आपली महात्मा फुले आश्रमशाळा आयएसओ मानांकन प्राप्त सोलर सिस्टीम पवनचक्की वापर अशी सुंदर सुसज्ज आहे.विवीध क्षेत्रातील मान्यवरानी शाळेच कौतुक केले आहे.एनजीओच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याची उर्मी बाळगण्याची प्रेरणा ही मला नेहमी स्फूर्तीदायक ठरलेली आहे. मुंबई पुणे दिल्ली येथे अनेक सामाजिक कार्य करणाऱ्यां गुणवंतांचा त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव सन्मान आपण आपल्या संस्थेचा माध्यमातून प्रती वर्षी करत आलोय. मग कोणाचं काम छोट असो की मोठ आपण आपल्या परीन त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करूयात या मानसिकतेने मलाही लढण्यास बळ मिळत गेलं सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम चित्रपट लघुपट निर्मिती करण्याचा छोटासा प्रयत्न केला. शिवाय गावच्या ग्रामपंचायत व विकासात प्रमुख सहभागीता उपक्रमशील असं कार्य करत मी आज काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाच्या विज्ञान तंत्रज्ञान व कौशल्य विकास विभागाचा महाराष्ट्र प्रदेश प्रमुख म्हणून काम करताना आनंद होत आहे.काँग्रेस पक्षात कार्य करण्याची संधी मिळाली.राज्यातील विविध क्षेत्रातील जिल्ह्यातील मान्यवर मंडळी सोबत विचाराचे अदान प्रदान करता आले,येत आहे मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला संघटन बांधणी करता आली.अजून खूप काम करायचे आहे संघर्ष करायचा आहे अनेकांच्या प्रेरणेने सुचनेने अनुभवाने आणि आशीर्वादाने नवीन सामाजिक,रोजगार,पशु वैद्यकीय सेवा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र,शैक्षणिक टुरिझम प्रकल्प, विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य पार्क, शिवसृष्टी राजीव गांधी आयटी पार्क उद्योग पार्क इत्यादी स्वतः सह सहकारी मंडळींना जोडून उभारण्याचा आपला मानस आहे.
आपल्या सर्वांचे सहकार्य हवे.आदरणीय आपण आमच्या माहिती तंत्रज्ञान वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद !
आपला सहस्नेहांकित - सुरेश यादव